बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना त्यांच्यात विश्वास निर्माण करा .अध्ययनाच्या संधी निर्माण करा .त्याना स्वतःचे ज्ञान स्वतः मिळवू द्या .आपल्या वर्ग खोल्यात सुबोध व संस्कारक्षम व्यक्तिमत्व घडत असते . विविध क्षेत्रात यश मिळवणारे विद्यार्थी समाज व शाळेचे वैभव असतात . विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा समाजहिताकरता उपयोग व्हावा , असे विचार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे जेष्ठ अधिव्याख्याता श्री विजय कोकरे यांनी व्यक्त केले .श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव आयोजित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते .
जिल्हा समन्वयक श्री संदीप जगताप यांनी अध्ययन अध्यापनातले विविध संकल्पना स्पष्ट करताना नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली .
संस्था अध्यक्ष डॉ . श्री सुरेशराव जाधव यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्पाची कौतुक केले .
उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव व सचिव श्री मोहनराव जाधव यांनी शिबिरा शुभेच्छा दिल्या .
विश्वस्त श्री एस . आर . पाटील सर यांनी प्रास्ताविक केले .
मा . प्राचार्य श्री डी .पी .शिंदे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली .
विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्पाचे श्री . के . डी . पवार सर यांनी स्वागत केले .
कार्यक्रमास विश्वस्त श्री योगेशराव देशमुख साहेब , विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सौ माधुरी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले .
श्री मोहनराव गुरव यांनी आभार मानले .
छायाचित्र - पुसेगाव श्री विजयराव कोकरे यांचा सत्कार करताना डॉ . श्री सुरेशराव जाधव, श्री संदीप जगताप, श्री .के .डी . पवार, श्री योगेशराव देशमुख ,श्री एस .आर .पाटील ,श्री डी .पी . शिंदे व मान्यवर छाया - प्रकाश राजेघाटगे





Social Plugin