भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी -
दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय नाट्य सभागृह, मंगळवारी पेठ, उमरेड येथे भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मा.सौ. प्राजक्ताताई रोहित कारू यांचा नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी माजी आमदार राजु पारवे तसेच माजी आमदार सुधीर पारवे
नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत तसेच अनेक मान्यवर नेते , पदाधिकारी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. उमरेड शहरातील जनतेने भाजपावर दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी शहरातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी लोकाभिमुख कार्य करण्याचे आवाहन यावेळी केले. या कार्यक्रमास अनेक मान्यवर, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin