प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव :-"गाव तेथे शाखा व घर तेथे सैनिक" या तत्त्वानुसार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या आदेशावरून सिद्धार्थ भगत ( जिल्हाध्यक्ष भा. बौ. महासभा ) ॲड. प्रा. मुकुंद वानखेडे ( जिल्हा कोषाध्यक्ष ), आणि महासचिव देवानंद वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम ढोरखेडा
तालुका मालेगाव येथे समता सैनिक दलाची शाखा स्थापना व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. आणि समता सैनिक दलाचे फलकाचे अनावरण वाशिम तालुका अध्यक्ष रनपाल सावळे ( भारतीय बौद्ध महासभा ) व मेजर जनरल अश्विन खिल्लारे, बौद्धाचार्य व वाशिम तालुका कोषाध्यक्ष धम्मपाल कांबळे व सहायक शिक्षक कविता डोंगरदिवे ( कंपनी कमांडर ) या सर्वांच्या हस्ते झाले संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिरासाठी केंद्रीय शिक्षक म्हणून वाशिम प्रमुख मेजर जनरल अश्विन खिल्लारे यांनी मार्गदर्शन केले. दिवसभर या शिबिरार्थींना समता सैन्य दलाचे महत्व, समता सैनिक दलाचे कार्य, सर्व समजावून सांगितले. या कार्यक्रमांमध्ये सैनिक दलाच्या ढोरखेडा शाखेच्या अध्यक्षा पुनम प्रशांत सावळे, उपाध्यक्ष रवीना सुभाष सावळे, सचिव अंजली विनायक सावळे, सहसचिव प्रतिभा विजय जाधव, कोषाध्यक्ष वैशाली बंडू सावळे, संघटक पूजा धम्मदीप सावळे, संघटक छाया सतीश सावळे, आणि संघटक नंदा बबन सावळे यांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणा साठी ढोरखेडा येथील सर्वच बौद्ध उपासक उपाशीका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





Social Plugin