Ticker

6/recent/ticker-posts

दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक, पिंपरी चिंचवड येथे रोहित पवार, अजित भाऊ गव्हाणे, अमोलभाऊ कोल्हे हे बैठकीला उपस्थित



महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी पिंपरी चिंचवड 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू असताना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात आज (दि.२५) पिंपरी चिंचवड शहरात एक गुप्त बैठक पार पडली. 

या बैठकीला शिरूर लोकसभेचे खासदार अमोलभाऊ कोल्हे, शरदचंद्र पवार‌ गटाचे आमदार रोहित पवार, शहराध्यक्ष तुषार कामठे, सुनील गव्हाणे, अजितदादा पवार राष्ट्रवादीचे नेते अजितभाऊ गव्हाणे यांच्या उपस्थितीत ही बैठक निगडी प्राधिकरण येथे पार पडली. 

या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येत भाजपाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजितभाऊ गव्हाणे यांनी दिली आहे. काही जागेवर दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा सुरू असून इतर जागेवर संगनमत झाले आहे. आज सर्व नेत्यांची अजितदादा पवारांसोबत बैठक होईल त्यानंतर येत्या एक-दोन दिवसांत जागा वाटपा संदर्भात निर्णय देखील जाहीर केला जाईल अशी माहिती अजितभाऊ गव्हाणे यांनी दिली.