तरुणाईला लागले 'थर्टी फस्ट' चे वेध
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील तरुणाई सज्ज झाली आहे. सरते २०२२ वर्ष संपण्यासाठी काहीं दिवस शिल्लक राहिले आहे. यासाठी नागरिकांनी विविध बेत आखले असून नववर्षाचे स्वागत शिस्तीतच करावे लागणार आहे. कारण रस्त्यावर किंवा विनापरवाना काव्यावर दारू पिऊन धिंगाणा घातला. तर जेलची हवा किंवा दंड सोसावा लागणारआहे.नववर्षाचे स्वागत करतानानववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करा, परंतु आपल्यामुळे कोणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. दारु पिऊन रस्त्यावर चिंगणा घालणे महाग पडू शकते. ३१ डिसेंबरला नवर्षाच्या स्वागताच्या नावावर कायद्याची पायमल्ली केली जाते.
अनेकजण मद्य प्राशन करून जोरात वाहन चालवत स्वत: हा सोबतच दुसऱ्याच्याही जीवाला धोका पोहचवतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कबर कसली आहे. सरत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाचे स्वागत शिस्तीत व शांततेत करण्याचे आवाहन पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनि संदिप पोमण केले आहेवास्तविक पाहता भारतीय संस्कृतीत थर्टी फस्टला मान्यता नाही पण तंत्रज्ञानाने जग एकत्र आणले आणि जगभरातील उत्सव हे आपल्याकडे साजरे होऊ लागले आहेत. आजही संस्कृतीला मानणारे यासाठी राजी नाहीत पण याचा आनंद घेणारे यांची संख्या वाढत चालल्याने तेही हतबल झाले. आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत या दरम्यान एकच दिवस असतो पण यात जी आर्थिक उलाढाल होते. यामुळे अर्थकारणालाही चालना मिळत आहे . याचे लोण ग्रामीण भागातही आता पोहोचले आहे .





Social Plugin