छायाचित्र - हुसेनपूर येथील पिंपळेश्वर विकास सेवा सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र सहायक निबंधक दाजी खताळ यांच्या हस्ते स्वीकारताना प्रदीप विधाते व पदाधिकारी उपस्थित होते.
बुध दि [प्रकाश राजेघाटगे]
खटावमध्ये सातारा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांच्या मार्गदर्शनात पिंपळेश्वर विकास सेवा सोसायटी, हुसेनपूर या नूतन सोसायटीची स्थापना करण्यात आली.
पिंपळेश्वर विकास सेवा सोसायटी, हुसेनपूर या नूतन सोसायटीचे नोंदणी प्रमाणपत्र खटावचे सहायक निबंधक दाजी खताळ यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांच्याकडे देण्यात आले. यावेळी दिलीप जाधव, किशोर डंगारे, विजय बोबडे, बबनराव घाडगे, राजेंद्र कुंभार, एकनाथ चव्हाण, गणेश शेडगे, किरण राऊत, स्वप्निल माळी उपस्थित होते. शेतकऱ्यांना अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रदीप विधाते यांनी सांगितले.





Social Plugin