Ticker

6/recent/ticker-posts

साडेबारा लाख रुपयांचा गुटखा जप्त.



प्रतिनिधी निरंजन बावस्कर 

 भोकरदन: पोलिसांनी पिंपळगाव रेणुकाई नजीक वरुड फाटा येथे रात्रीच्या सुमारास कारवाई करत १२.५० लाख रुपयांचा गुटखा व २ बोलेरो पिकप जप्त केला आहे. या प्रकरणांमध्ये तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वाहनसह एकूण३२ लक्ष६४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दानापूर मार्गे अवैद्य गुटखा घेऊन २बोलेरो पिकप भोकरदन कडे येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता. या माहितीनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये  पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी पथक तयार करून कारवाई केली.

       पोलिसांनी ही वाहने थांबून चालकाकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवी चे उत्तर दिले. त्यानंतर चालकांनी वरुड फाटा या मार्गाने पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही वाहन पकडली व भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये आणले.

      पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे हे करीत आहे.