Ticker

6/recent/ticker-posts

चिंचखेड मंडपगांव शिवरातून खडकपूर्णा नदीतून अवैध रेती वाहतूक सुरूच .



प्रतिनिधी @समाधान भुतेकर

सतत रेती बंदची हाक ऐकू येत असताना चिंचखेड मंडप गाव शिवारातून सर्रास खडकपूर्णा प्रकल्पातून रेतीचा उपसा करून रात्रभर वाहतूक होताना दिसत आहे तेव्हा ही बंदची हाक आली कोठून ही शंका उत्पन्न होत आहे रात्रभर आणधुंद वेगाने नशेत हे चालक रेती वाहतूक करीत आहेत रस्ता बंद केला अशी चर्चा होती तर रस्ता सुरु झाला कसा आणि बंद असेल तर ही रेती वाहतूक सुरु कशी सर्व प्रश्नच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेले आहेत. विशेष बाब म्हनजे ही वाहतूक शसकीय सुट्टीच्या दिवसा अगोदर शुक्रवारी, शनिवारी रात्री मोठया प्रमाणात चालते या आनाधुंद वेगाने एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेला एकाद्याला प्रणास मुकावे लागू शकते तेव्हा प्रशासनाने लक्ष घालून योग्य ते कडक नियम करून रात्रीची अवैध रेती वाहतूक बंद करावी अशी सर्वसामान्याची मांगणी आहे.