कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
माळकिणी - दिनांक 31 डिसेंबर 2025, बुधवार रोजी सकाळी मंठा पंचायत समिती मंठाचे शिक्षणविस्तार अधिकारी मा श्री के जी राठोड यांनी माळकिणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला अचानक भेटी दिली. शाळेचा परिसर, परसबाग, शौचालय, किचनशेड, पिण्याचे पाणी,वर्ग खोल्याची पाहणी करून समाधान व्यक्त केलं.विद्यार्थ्यांचे लिहलेले शुद्ध लेखन पाहिले, अतिशय सुंदर व उत्कृष्ट इंग्रजी अक्षर बघून विद्यार्थाचे कौतुक केले, अभिनंदन केले. शैक्षणिक प्रगती पाहुन समाधान व्यक्त केले. मध्यान्ह भोजनची व्यवस्था पाहिली. उत्कृष्ट शालेय पोषण आहार शिजवित असल्याबद्दल कौतुक केले. शालेय तपासणी अंती शाळेचे वातावरण व गुणवत्ता पाहुन समाधान व्यक्त केले. या वेळी शिक्षणविस्तार धिकारी मा श्री के जी राठोड,पांगरी बु. चे केंद्रीय मुख्याध्यापक मा श्री आर व्ही आढे यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री भगवान जायभाये, शाळेतील शिक्षक श्री संदीप धामणे आणि श्री श्रीनिवास सुदेवाड यांनी स्वागत करून शाळेला भेट देऊन मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.





Social Plugin