Ticker

6/recent/ticker-posts

लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे जालना येथे युवा महोत्सव २०२५–२६ यशस्वी.



कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी 

जालना : विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, जालना यांच्या वतीने युवा महोत्सव २०२५–२६ हा उपक्रम जालना येथे हायब्रिड पद्धतीने (प्रत्यक्ष व ऑनलाइन) यशस्वीरीत्या पार पडला.

या युवा महोत्सवामध्ये जालना जिल्ह्यातील एकूण १०४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, यापैकी ४१ विद्यार्थी प्रत्यक्ष तर ६३ विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते. कार्यक्रमाअंतर्गत ब्लॉग लेखन, छायाचित्रण, चार्ट मेकिंग आणि वादविवाद अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये ७८ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलता, विचारशक्ती, विश्लेषण क्षमता आणि संवाद कौशल्ये प्रभावीपणे सादर करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध झाले. तसेच या कार्यक्रमास पालकवर्ग व स्थानिक समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रोत्साहन मिळाले.

युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, अभिव्यक्ती कौशल्य आणि शिकण्याची सकारात्मक वृत्ती विकसित होण्यास मोठी मदत झाली, असे मत लाइट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आयोजकांनी व्यक्त केले.