Ticker

6/recent/ticker-posts

ट्रस्टचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू :आ महेश शिंदे .



श्री सेवागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन 

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

         मनातील मालिन्य , द्वेष भावना काढून टाकण्याची शक्ती प पू श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीत आहे.या देवस्थानच्या विकासासाठी ,भरभरासाठी तसेच शासनदरबारी ट्रस्टचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांनी दिले.

          सेवागिरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी प्रदर्शनाचे उदघाटन आ . महेश शिंदे,माजी जलसंपदा मंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, कराड उत्तरचे आ . मनोज घोरपडे, आहन मकरंद पाटील, यांचे हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले . यावेळी देवस्थान ट्रस्ट चेअरमन संतोष वाघ ,विश्वस्त डॉ सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख .गौरव जाधव ,

प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणे, तहसीलदार बाई माने, गट विकास अधिकारी योगेश कदम,प्रभारी सरपंच विशाल जाधव, ग्रामपंचायत अधिकारी अर्जुन नागरगोजे  व इतर मान्यवर उपस्थित होते.

          आ महेश शिंदे म्हणाले, कृषी विभागाने जागोजागी ए आय सेंटर उभारावेत जेणेकरून  शेतकऱ्यांना शेती साठी त्याचा वापर करता येईल.

आमदार शशिकांत शिंदे  म्हणाले, देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनाद्वारे शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या विकासासाठी निधी मिळावा,शासकीय विद्यानिकेतन कडून ट्रस्ट ला दिलेल्या जागेचा प्रश्न शासनाने तातडीने निकाली काढावा, तसेच देवस्थानला अ वर्गाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आ . मनोज घोरपडे म्हणाले, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यासाठी कृषी प्रदर्शने व शेतकऱ्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे गरजेचे आहे.

          यात्रेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी देवस्थान ट्रस्टला निधीची गरज असल्याचे नमूद करत ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ यांनी देवस्थान ट्रस्टचे 

 प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी  सहकार्य करावे अशी मागणी केली..

 दरम्यान देवस्थान  ट्रस्टच्यावतीने निवडक शेतकर्‍यांना सेवागिरी कृषीनिष्ठ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गैोरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहनराव गुरव तर आभार रणधीर जाधव यांनी मानले.

छायाचित्र - पुसेगाव - श्री सेवागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना आ .महेश शिंदे, आ . शशिकांत शिंदे, आ . मनोज घोरपडे, आहन मकरंद पाटील,ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ सर्व विश्वस्त व इतर