शिवशंकर तुपकर सोनपेठ दि.४(प्रतिनिधी)
सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील व्टेंन्टीवन शुगर या कारखान्यावर पहिल्या उचलीच्या मागणीसाठी चार दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन उपविभागीय अधिकारी संगिता चव्हाण यांच्या मध्यस्थीने २७२५ रु पहिल्या उचलीवर मागे घेण्यात आले असुन जिल्ह्यातील ऊसाच्या पहिल्या उचलीची कोंडी फुटली आहे.
बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या ऊसदाराचे आंदोलनाचे लोन परभणी जिल्ह्यात पसरुन सोनपेठ तालुक्यातील व्टेंन्टीवन शुगर या कारखान्यावर दि १ डिसेंबर पासून ठिय्या आंदोलन सुरु केले होते.
युवा शेतकरी संघर्ष समिती,स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी यांचे मागील चार दिवसांपासून कारखाना परिसरात हे आंदोलन सुरू होते. कारखाना प्रशासनाने गुरूवारी याची दखल घेऊन तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी संगिता चव्हाण यांच्या अध्यक्षतेत बैठक घेतली. या बैठकीस तहसिलदार सुनिल कावरखे, सोनपेठ पोलिसांचे पोलिस निरिक्षक अशोक गिते, अजय किरकन ट्वेंटीवन शुगर्सचे विजय देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख,राजन क्षीरसागर,उदय देशमुख,अजय बुरांडे, सुधीर बिंदू, किशोर ढगे लक्ष्मण पौळ,विश्वंभर गोरवे, रामेश्वर मोकाशे,ॠषीकेश जोगदंड, सुरेश ईखे , ओमकार पवार यांच्या सह परीसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. बैठकीत ऊस दरावर यशस्वी चर्चा होऊन यंदाच्या गाळप हंगामात पहिली उचल २ हजार ७२५ प्रति मेट्रीक टन देण्यासाठी कारखाना प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले
चार दिवसांनंतर तब्बल सहा तास झालेल्या चर्चेनंतर रात्री आठ वाजता ही घोषणा कारखान्याच्या वतीने जाहीर करण्यात आली.





Social Plugin