(ज्ञानदिप पाटील ग्रामीण प्रतिनिधी)
पारोळा -आज जि प प्राथ शाळा क्र ३ पारोळा याठिकाणी शाळेच्या ३६ गरजु बालक व विदयार्थ्यांना कडाक्याच्या थंडी पासुन संरक्षण होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांच्या विनंतीने अनिल कथ्थु शिंपी , किराणा व्यापारी यांनी आपले पूज्य पिताश्री कै कथ्थु चुणिलाल शिंपी यांच्या १० व्या पुण्य स्मरणार्थ उच्च प्रतीचे उबदार उलन ब्लॅन्केट भेट देवुन मायेची ऊब दिली आहे .
शाळेचे सर्वच विद्यार्थी गरीब परिवारातून येणारे व पत्र्याच्या घरात राहणारे असल्याने कडाक्याच्या थंडीत मोठा दिलासा त्यांना मिळणार आहे . या स्तुत्य उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक गुणवंतराव शिवदास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणुन दिपक कोळपकर , किशोर सोनवणे , माधवराव शिंपी , डॉ गौरव पाटील , मालती शिंपी दाते अनिल कथ्थु शिंपी व त्यांच्या धर्मपत्नी वैशाली शिंपी सह संपूर्ण गवांदे - शिंपी परिवार उपस्थित होता .
कै कथ्थु चुणिलाल शिंपी हे जीवनभर श्रीबालाजीचे भक्त होते . धार्मिक ग्रंथाचे पारायण व गायत्री परिवाराचे कार्य त्यांनी जीवनभर केले . पारोळा श्री बालाजी रथयात्रा उत्सवात प्रथम वहन पासुन तर शेवटच्या वहनापर्यंत मांडणी करण्याची त्यांची भूमिका खुप महत्वाची होती .
यावेळी त्यांचे जेष्ठ सुपुत्र माधवराव कथ्थु शिंपी यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला . जीवनभर कै दादा व्रतस्थ जीवन जगले , शेवटच्या क्षणापर्यंत बालाजी चरणी व सेवेत ते समर्पित राहीले . त्यांचा आदर्श आमचा परिवार खात्रीने असाच पुढे सुरु ठेवेल असे प्रतिपादन त्यांनी केले .
गुणवंतराव पाटील यांनी कै कथ्थुशेट आमच्या सारख्यांसाठी एक आदर्श होते . अध्यात्मिकतेचे जीवनात किती महत्व असते याचे ते उत्तम उदाहरण होते अशी भावना व्यक्त केली .
बालकांना ऊबदार ब्लॅन्केट मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता .
या उपक्रमाला अर्चना सेवलीकर , दिपाली पाटील , तरन्नुम सैय्यद व नयना मराठे यांचे अनमोल सहकार्य लाभले . मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले .





Social Plugin