Ticker

6/recent/ticker-posts

बुध येथे श्री पिंगळजाई देवी प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न.



बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

 बुध , बिदाल , पेडगाव , मसूर , कुमठे येथील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री पिंगळजाई देवीस श्री तुळजाभवानीचे रूप मानले जाते .  नुकतीच येथील भक्तांनी श्री पिंगळजाई मंदिराची उभारणी बुध ता खटाव येथे  करण्यात आली आहे . या मंदिरात  श्री पिंगळजाई देवीची प्राणप्रतिष्ठा मंगलमय वातावरणात करण्यात आली . होमहवन , पौराहित्य प .पू . श्री परशुराम महाराज अंभेरी यांनी केले . या कामी माजी प्राचार्य श्री . के . डी . पवार , डॉ .उमेश जगदाळे , हणमंत जगदाळे , रामचंद्र जगदाळे , अंकुश जगदाळे , रामचंद्र चव्हाण यांनी विशेष योगदान दिले .

प्रा . संभाजी जगदाळे , बाळासो जगदाळे , श्रीधर जगदाळे , अंगतराव जगदाळे  , श्री सुहासराव जगदाळे , श्री रविंद्र जगदाळे , तसेच कै . नितीन पाटील , कै . कॅ . राजाराम जगदाळे यांच्या कुटंबांचे विशेष आर्थिक योगदान लाभले . यावेळी बुध माहेरवासीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

उपसरपंच श्री अभयसिंह राजेघाटगे यांनी आभार मानले .