बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल ज्युनियर कॉलेज किमान कौशल्य व तांत्रिक विभागाचे पर्यवेक्षक - इंग्रजीचे व मराठी विषयाचे अभ्यासक व प्रसिद्ध सूत्रसंचालक श्री मोहनराव गुरव (सर) यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्याअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कथाकथनासाठी निवेदक म्हणून निवड झाली असल्याची माहीती महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पुसेगावचे मार्गदर्शक व प्रसिद्ध लेखक श्री संजयराव जाधव यांनी दिली .आपल्या तालुक्यातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निवेदक मधून संधी प्राप्त झालेले ते पहिले निवेदक ठरले आहेत .
या निवडीबद्दल श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे अध्यक्ष . डॉ . श्री .सुरेश जाधव, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव ,सचिव श्री मोहनराव जाधव, संस्थेचे सर्व पदाधिकारी ,गुणवत्ता वाढ प्रकल्पाचे .श्री .के .डी . पवार (सर) , श्री . जयंतराव जाधव ,श्री . डी .पी . शिंदे (सर )तसेच विविध शाखांचे मुख्याध्याक ,सर्व सहकारी, ग्रामस्थ तसेच साहित्यप्रेमी रसिकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या





Social Plugin