Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेडराजा निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात; मतदान साहित्य केंद्रांकडे रवाना.



 नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज प्रत्येकी 21  मतदान केंद्रावर मतदान साहित्य रवाना

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेड राजा :-  नगर परिषद निवडणूक 2025 साठी तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्या  दिनांक 2 डिसेंबर 2025 च्या होणाऱ्या मतदानासाठी आज एकूण 21 मतदान केंद्रावरील मतदान साहित्य वाटप करण्यात आले आहे.

सिंदखेडराजा नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण 21 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली असून त्यासाठी लागणारे साहित्य आज नगर परिषद कार्यालय सिंदखेडराजा येथून मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नेतृत्वाखाली वाटप करण्यात आले.

प्रत्येक मतदान केंद्रावर चार अधिकारी व पोलीस कर्मचारी अशी प्रत्येक मतदान केंद्राची रचना असते. आज हे सर्व मतदान साहित्य एकूण 84 अधिकारी आणि 38 पोलीस कर्मचारी यांच्यासोबत  आज दुपारी मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले. मतदान केंद्रावर पाठवलेल्या कर्मचारी व्यतिरिक्त एकूण 30 कर्मचारी राखीव मध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी वाहतूक व्यवस्था पुरविण्यात आली होती.

आजच्या या साहित्य वाटपसाठी मा. निवडणूक निरीक्षक जी.पी. साबळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. 

मा. निवडणूक निर्णय अधिकारी  प्रा. संजय खडसे,मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिष बोबडे,  मा. तहसीलदार सिंदखेड राजा अजित दिवटे, मा. गट विकास अधिकारी  अजित कुमार बांगर, मा. नायब तहसीलदार डॉ.प्रवीणकुमार वराडे, मा. गट शिक्षण अधिकारी स्वप्नील निकम, मा. कृषी अधिकारी भागवत किंगर,मा. पोलीस निरीक्षक आशिष इंगळे, मा. पोलीस उप निरीक्षक बालाजी सानप, श्रावण डोंगरे,कनिष्ठ अभियंता अवधूत कापसे, रजत मराठे, प्रभू वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीमने आपले कार्य यशस्वीरित्या आज पूर्ण केले. या संपूर्ण टीम च्या कामाचे मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. खडसे यांनी कौतुक केले.