बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ माध्या व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मध्ये महात्मा ज्योतीराव फुल यांच्या स्मृतिदीनी प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले . यावेळी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक तानाजी पाटील यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेले सामाजिक व शैक्षणिक कार्य याबद्दल मनोगत व्यक्त केले . आज सर्वच क्षेत्रांत मुलींची व महिलांची प्रगती झालेली दिसून येते यांचे क्षेय महात्मा फुले यांना जाते . पूर्वी महिलांना चुल आणि मुल या दृष्टिकोनातून पाहिले जात होते परंतू आज महिलांची प्रगती सन्मान प्रत्येक ठिकाणी झालेला दिसून येतो . स्पर्धा परीक्षेत मुली आव्वल ठरत आहे असे मत व्यक्त केले . भगवान सरवदे यांनी देखील महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा सांगितला . रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून पहिली जयंती साजरी केली . . विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे , पर्यवेक्षक नाना दडस , प्राध्यापक शिक्षक - शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सरवदे यांनी केले तर आभार नामदेव धनवडे यांनी मानले .





Social Plugin