Ticker

6/recent/ticker-posts

*अन् पुन्हा बाळासाहेब अवतरले.*




बुध  दि [ प्रकाश राजेघाटगे ] 

   हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे हे या देशाला पडलेलं एक एक अलौकिक नेतृत्व होते. एखादा शब्द किंवा वक्तव्य केले तर ते कधीही माघार घेत नसत म्हणून तर सण 1995 साली महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युती शासन आल्यानंतर त्यांच्या कल्पक विचारातून कृष्णा खोरे महामंडळाचा उगम झाला. या महामंडळाच्या माध्यमातून कृष्णा नदीवर जिहे-कटापूर(कोरेगाव तालुका) येथून बंदिस्त पाईपलाईन द्वारे सातारा जिल्ह्यातील खटाव - माण या तालुक्यांना जलसिंचनाची योजना अमलात आणली. त्या काळात या योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले पण नंतर आलेल्या आघाडी सरकारच्या काळात ह्या योजनेच्या बाबत अनास्था दाखवली गेली त्यामुळे ही योजना गेली कित्येक वर्ष रखडली गेली परंतु श्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना दिलेली प्रशासकीय मान्यता व केंद्राने दिलेल्या भरगोस निधीमुळे ही योजना आता पूर्णत्वाकडे गेली असली तरी या जिहे-कटापूर जलसिंचन योजनेचे खरे जनक शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे आहेत हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे; परंतु गेल्या काही दिवसापासून या योजनेचा जलपूजन कार्यक्रम तालुक्यात होत असताना शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा साधा फोटो सुद्धा दिसत नव्हता परंतु तालुक्यातील दोन्ही आमदारांना शिवसेनाप्रमुखांचे कामाची उपरती झाल्याने बाळासाहेबांचे नाव व फोटो आता पुन्हा एकदा दिसू लागल्याने साहेब पुन्हा अवतरले अशी चर्चा दुष्काळी जनतेत आहे.

    कोरेगाव तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी श्री महेश शिंदे हे शिवसेनेकडून आमदार आहेत. परंतु ते शिवसेनेचे कमी आणि भाजपाचे प्रतिनिधी असल्यासारखे वागत आलेले आहेत. या योजनेला श्री बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत असताना त्यांनी या योजनेचे नामांकरण कै. लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजना असे केले आहे. पण दुष्काळी जनतेला या योजनेचा खरा जनक हे बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे माहीत असल्यामुळे आता निढळ तालुका खटाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या फ्लेक्स वर पहिल्यांदाच श्री बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला गेला. काही दिवसानंतर ते या योजनेला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यासाठी अनुकूल होतील अशी आशा तालुक्यातील शिवसैनिकांना वाटत आहे. 

      राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार श्री शशिकांत शिंदे यांनीही जलपूजनाचा कार्यक्रम घेतला. यावेळी त्यांनी या योजनेला श्री बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी जर लोकआग्रह असेल तर ते स्वतः या लढाईत जातीने लक्ष घालतील असे कबूल केले आहे. त्यामुळे कायम शपथेवर बोलणारे श्री शशिकांत शिंदे आता जनतेच्या मनातील बोलत आहेत असे दिसून येत आहे. 

      खरंतर महाविकास आघाडीचे सरकार असताना या योजनेला शिवसेनाप्रमुख यांचे नाव देण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत हे खेदाने नमूद करावे लागेल. भाषणबाजीत तरबेज असणारे उपनेते यांना त्यांच्याच पक्षाच्या पक्षप्रमुखांना वंदनीय बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख व्हावा असा विचार करावा असा आग्रही धरता आला नाही. बाकी ती कित्येकदा श्री उद्धव ठाकरे यांची दूरध्वनीवरून चर्चा करतात असे लोकांना सांगतात परंतु आपण मात्र कोरडे पाषाण होऊन शांतपणे होणाऱ्या गोष्टीकडे पाहतात. आता मात्र ते सुद्धा म्हणतात की खळखळनाऱ्या पाण्यामधून बाळासाहेबांचे नाव उजळेल. म्हणजे सरते शेवटी त्यांनाही शिवसेनाप्रमुखांची आठवण झाली असेच म्हणावे लागेल. 

     जाता जाता शेवटी एवढेच म्हणावे लागेल की, लोकोत्तर विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व कायम अजरामर असते त्यामुळे राजकारणी लोकांनी आपल्या विचारांचा खुजेपणा दाखवू नये एवढीच इच्छा सामान्य जनता करत असते.