महेंद्र वानखडे ग्रामीण प्रतिनिधी पिंपळखुटा
गेल्या महिन्यात खांबावरील तुटलेल्या जिवंत तारेला चिटकून पिंपळखुटा येथील संतोष अर्जुन वानखडे यांचा साठ हजार किमतीचा एक बैल ठार झाला होता. पण विद्युत निरीक्षक अकोला यांच्याकडून अद्यापही अहवाल न आल्यामुळे त्यांना महावितरण करून अद्यापही कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकली नाही! संतोष अर्जुन वानखडे हे अल्पभूधारक शेतकरी असून उत्पन्नाचे साधन म्हणून या जोडीचा वापर करीत असत पण महावितरण विभाग सस्तीच्या ढिसाळ कारभारामुळे प्राणांतिक अपघात होऊन त्यांचा एक बैल ठार झाला असल्याने त्यांचा रोजगार बुडाला आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सर्वसामान्यांचे जीवाशी काही घेणं देणं नसून उद्या जर कोणी माणसाचा मृत्यू झाल्यास याला जबाबदार कोण राहील? पातुर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अनधिकृत जोडण्या करून महावितरणच्या विजेचा कुंपणात प्रवाह सोडून संरक्षण करण्याचा नवा फंडा काही लोकांनी सुरू केला असून पाळीव प्राण्यासह काही वन्य प्राणी सुद्धा या प्रवाहाच्या संपर्कात येऊन ठार झालेले आहेत. एवढं होत असताना महावितरणचे कर्मचारी मात्र कोणावरही कसली कारवाई करत नसून शिकारी साठी सुद्धा बरेच जण महावितरणच्या विजेचा वापर करीत आहेत. तालुक्यातील अनेक गावात महावितरण च्या खांबा मध्ये जिवंत प्रवाह येत असून खांबाला लावलेल्या तानामध्ये प्राण्यांची अपघात होऊन पाळीव प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. पिंपळखुटा येथील एका युवकाचा सुद्धा अवैध मार्गाने घेतलेल्या विजय मुळे मृत्यू झाला असताना महावितरण चे कडक कारवाई न करता सुस्त कसे काय राहतात? हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे?





Social Plugin