प्रतिनिधी @समाधान भुतेकर
युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर व विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख ओमराजे गायकवाड यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे दिले निवेदन पुरवठा विभागाचे मनमानी धान्य पुरवणारा प्रशासनाचा शासनाचा जावई आहे का?आंधळ दळत कुत्र पीठ खात या म्हणीप्रमाणे वर्षभरात विशेषता या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे राशन वाटप झालं त्यामध्ये तांदूळ आणि ज्वारीचे वाटप करण्यात आलं सदर ज्वारी व तांदूळ हे एवढे निकृष्ट दर्जाचे होते की ते जनावरांना सुद्धा खाण्यायोग्य नव्हते आणि तेच धान्य आपले यंत्रणेने चक्क माणसांना खाण्यासाठी दिलं जिल्ह्यामध्ये अनेक कुटुंब असे आहेत की ज्यांना राशनचं धान्य खाल्ल्याशिवाय पर्याय नाही त्या गोरगरिबांना हेच आळ्या, किडे, भुंग व जाळ असलेलं खाण्यासाठी आपण दिलं हे गोरगरिबांची थट्टा असून हे धान्य देत असताना आपल्या यंत्रणेला किंवा अधिकाऱ्यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती याच वेळी नाही तर अनेकदा असे निकृष्ट धान्य देऊन आपल्या विभागामार्फत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला जातो आहे हे आता उघड झाले आहे हे धान्य पुरवणारी यंत्रांना कोणती व त्या यंत्रणेला खपवून घेणाऱ्या चालवणारा अधिकारी कोण तो शासनाचा व प्रशासनाचा जावई आहे काय? या यंत्रणेवर व अधिकाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कठोर कारवाई झाली पाहिजे. यांच्यावर रीतसर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.भूमिका घेतली अशी
साहेब दुसरा मुद्दा म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षापासून आपल्या विभागाने अनेक गोरगरीब कुटुंबाकडून धान्य नाही तर आपल्याला पैसे मिळतील असे म्हणून फॉर्म भरून घेतले होते त्या लोकांना अजून पैसेही मिळाले नाही व धान्य सुद्धा मिळत नाही ते वारंवार आपल्या पुरवठा विभागाकडे चकरा मारत असतात परंतु पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याकडून त्यांना समाधानकारक उत्तरे सुद्धा मिळत नाही आपण त्यांचा प्रश्न तातडीने निकाली लावावा एक तर धान्य द्यावे किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यावे आणि नेमकं घोडं कुठे अडलंय ते कधी मार्गी लागणार याचा तरी किमान खुलासा करावा जेणेकरून लोकांना तुमच्या दारात चकरा मारण्याच काम पडणार नाही.
वरील मुद्द्यांची आपण सखोल चौकशी करून तातडीने कारवाई न केल्यास प्रशासनाच्या विरोधात दि. 23 12 2025 रोजी आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा यावेळी दिला.





Social Plugin