"एक दिवस गावासाठी उपक्रम"
दुधगांव (ता. मिरज):
संकल्प फाउंडेशन, दुधगांव यांच्या वतीने “माझा गाव सुंदर गाव” या संकल्पनेतून प्रत्येक महिन्यात एक दिवस गावासाठी हा सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत दुधगांव येथे नुकताच स्वच्छता व सुशोभिकरण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात गावातील हायस्कूल शाळा परिसर येथे स्वच्छता करण्यात आली. साचलेला कचरा हटवून परिसर स्वच्छ व नीटनेटका करण्यात आला.
गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवणे तसेच ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमात संकल्प फाउंडेशनचे रोहित शिपुगडे, शरद माने, अमोल यादव. विवेक यादव, संजय मोरे, सचिन घोडके, डॉ विजय आडमुठे, अनिल आडमुठे, प्रमोद शिपुगडे, सुधिर रानगे, दिनकर सिद्ध, सुजित माने. अक्षय नलवडे, सुशांत आडके, ऋषिकेश सिद्ध. हर्षल, अन्वित, देवेंद्र, संतोष, व जय हनुमान मंडळाचे सर्व सभासद यांनी सक्रिय सहभाग घेतला.
तसेच गावातील नागरिक व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सर्वांच्या श्रमदानामुळे परिसर अधिक स्वच्छ व आकर्षक झाला. हा उपक्रम कोणत्याही राजकीय स्वरूपाचा नसून पूर्णतः सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येत असल्याचे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संकल्पचे अध्यक्ष निखिल नलवडे यांनी सांगितले की,“हा उपक्रम केवळ एक दिवसापुरता मर्यादित नसून दर महिन्याला वेगवेगळ्या विषयांवर – स्वच्छता, सुशोभिकरण, शाळा, नदी व सार्वजनिक ठिकाणांबाबत – सातत्याने राबविण्यात येणार आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल संकल्प फाउंडेशनच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले. भविष्यात अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले





Social Plugin