Ticker

6/recent/ticker-posts

सिल्लोड पालिकेवर अब्दुल सत्तारांचे एकहाती वर्चस्व.





भाजपचा सुपडा साफ; नगराध्यक्षपदी अब्दुल समीर यांचा २३ हजार मतांनी ऐतिहासिक विजय

सिल्लोड प्रतिनिधी - आकाश कोके 

सिल्लोड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्थानिक आमदार तथा मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिद गट) पक्षाने विरोधकांना धूळ चारत नगर परिषदेवर एकहाती सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या २८ पैकी २५ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून, भारतीय जनता पार्टीचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मिळालेली मते

अब्दुल समीर अब्दुल सत्तार (शिवसेना) - ३१४३८ (विजयी)

मनोज गंगाराम मोरेलू (भाजप) - ७८९२

 बनेखा नुस्खा पठाण (वंचित बहुजन) - १०३२

अमोल इंदरसिंग दुधे (अपक्ष) - १२५

अमोल काशिनाथ कुदळ (अपक्ष) - ६३

राजू भागवत रोजेकर (बसपा) - १०१

शेख अजीम सिद्धू (अपक्ष) - ४६

निवडणुकीच्या विकासकामे, प्रचारात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि रोजगार हे मुद्दे केंद्रस्थानी होते. मतदारांनी अब्दुल सत्तार यांच्या 'सिल्लोड पॅटनीवर विश्वास दाखवत भरघोस मतदान केले. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी ऐतिहासिक आघाडी घेतली. त्यांनी ३१ हजार ४३८ मते मिळवत भाजपचे उमेदवार मनोज मोरेलू यांचा तब्बल २३ हजार ६२६ मतांनी पराभव केला. भाजप उमेदवाराला केवळ ७ हजार ८९२ मते मिळाली, तर ८ हजारांचा टप्पाही गाठता आला नाही. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अब्दुल समीर यांनी मोठी आघाडी कायम ठेवली होती. या विजयाने सिल्लोडच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे.

विजयानंतर शहरात शिवसैनिकांनी भव्य मिरवणूक काढत जल्लोष केला. फटाक्यांची आतषवाजी आणि ढोल-ताश्यांच्या गजरात हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. विजयानंतर बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी मतदारांचे आभार मानले. आमदार अब्दुल

सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पारदर्शक कारभार, नागरी सुविधांचे सक्षमीकरण आणि युवकांसाठी संधी उपलब्ध करून देणे यावर आपला भर असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, या निवडणुकीत भाजपची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, त्यांना २८ पैकी केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

प्रभाग निहाय विजयी व पराभूत उमेदवार

प्रभाग १ अः सुधाकर बाबुराव गायकवाड (शिवसेना, १६०० मते) विजयी. पराभूतः काकासाहेब साळवे (भाजप, १२४१), जगन्नाथ आरके (काँग्रेस, ७६).

प्रभाग १ बः पार्वताबाई सुखदेव दुधे (शिवसेना१७८६ मते) विजयी. पराभूतः विमलबाई दुधे (भाजप, ११८२), प्रभाग २ अः सपकाळ विठल म्हतारजी (शिवसेना, १६१३ मते) विजयी. पराभूतः गवळी निखील (भाजप, ५६९).

प्रभाग २ बः वैशाली नरेंद्र पाटील (शिवसेना, १६१२ मते) विजयी. पराभूतः राऊत आशा (भाजप, ५६४).

प्रभाग ३ अः शेख आसिफ शेख नबी बागवान (शिवसेना, ३०१८ मते) विजयी. पराभूतः आळणे शामराव (भाजप, ३९१). प्रभाग ३ बः पठाण तहेसीनखान फेरोजखान (शिवसेना, ३०७९ मते) विजयी. पराभूतः शेख निलोफर (भाजप, २९५),

प्रभाग ४ अः मिरझा साजेदा बेग चांद (शिवसेना, १२८९ मते) विजयी. पराभूतः रुपाली मोरेल्लू (भाजप, ९९१).

प्रभाग ४ बः आहेर सिद्धेश्वर माणिकराव (शिवसेना, १३१५ मते) विजयी. पराभूतः तायडे भाऊसाहेब (भाजप, ८६२).

प्रभाग ५ अः शिनगारे स्नेहल स्वप्नील (भाजप, १२७१ मते) विजयी. पराभूतः शेख शबाना (शिवसेना, ११७९).

प्रभाग ५ बः पाटील सुधाकर पंडित (शिवसेना, १२७६ मते) विजयी. पराभूतः मिरकर सुनील (भाजप, १२७४).

प्रभाग ६ अः शेख रऊफ शेख मोहम्मद मुसा (शिवसेना, ३०१३ मते) विजयी, पराभूतः कारले अमोल (भाजप, १८५).

प्रभाग ६ बः शेख नूरजहाँ बेगम सत्तार (शिवसेना, २०५८ मते) विजयी. पराभूतः शेख साजिया (राष्ट्रवादी, २६८).

प्रभाग ७ अः शेख बाबू शेख भिकन (शिवसेना, १८९७ मते) विजयी. पराभूतः कुमावत आकाश (भाजप, १८२).

प्रभाग ७ बः झंवर सविता मनोज (शिवसेना, १८६४ मते) विजयी, पराभूतः शेख जकीया (काँग्रेस, १४९),

प्रभाग ८ अः भूमकर रेखा गणेश (भाजप, १९८० मते) विजयी. पराभूतः सहारे राजश्री (शिवसेना, १८९४),

प्रभाग ८ बः कटारिया कमलेश गोविंदराम (भाजप, १९२४ मते) विजयी.

पराभूतः जाधव सागर (शिवसेना, १८७३).

प्रभाग ९ अः निकम राजश्री राजरत्न (शिवसेना, ३२७२ मते) विजयी. पराभूतः नाटेकर प्रीती (काँग्रेस, १९९).

प्रभाग ९ बः कुरेशी मोहम्मदनूर मोहम्मद साबेर (शिवसेना, २७७० मते) विजयी. पराभूतः कुरेशी सैयद अनिस (अपक्ष, ७८९).

प्रभाग १० अः आरके मनीषा जितेंद्र (शिवसेना, २७०० मते) विजयी, पराभूतः आरके लिलाबाई (काँग्रेस, १२८).

प्रभाग १० बः पठाण जुम्माखा गुलशेरखा (शिवसेना, २४७० मते) विजयी. पराभूतः पठाण इरफान खान (वंचित, ३४९).

प्रभाग ११ अः सैयद अनिसा बेगम पाशु (शिवसेना, २९१३ मते) विजयी. पराभूतः धाडगे अनिता (भाजप, ४०१).

प्रभाग ११ बः शेख मोहम्मद कयुम मो नजीर (शिवसेना, २८०९ मते) विजयी, पराभूतः शेख मुख्तार (एमआयएम, १३८),

प्रभाग १२ अः पठाण रईसखान मुजावर (शिवसेना, ३१५२ मते) विजयी पराभूतः शिरसाठ किरण (भाजप, २०४).

प्रभाग १२ बः पठाण फातमाबी जब्बारखान (शिवसेना, ३२०४ मते) विजयी. पराभूतः कुलकर्णी प्रेरना (भाजप, ३४२).

प्रभाग १३ अः अग्रवाल रेखा किशोर (शिवसेना, ११८९ मते) विजयी. पराभूतः धाडगे अनिता (भाजप, ५०७).

प्रभाग १३ वः शेख अकिल शेख समद (शिवसेना, ९३८ मते) विजयी. पराभूतः प्रशाद सुनील (भाजप, ६६६),

प्रभाग १४ अः बन्सोड सुमन अशोक (शिवसेना, १७८५ मते) विजयी, पराभूतः प्रशाद नाईक मृणाली (भाजप, ४९३).

प्रभाग १४ बः शेख इमरान नजीर अहेमद (शिवसेना, १७०२ मते) विजयी, पराभूतः प्रशाद नाईक चिराग (भाजप, ५८२).