Ticker

6/recent/ticker-posts

शासनाने आदिवासी भागातील दाखले लवकरात लवकर द्यावेत सोनियाताई राजदेव.



ग्रामीण प्रतिनिधी भानुदास गोविंद आग्रे.

       टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील आदिवासी भागातील दाखले लवकरात लवकर शासनाने दिले असते तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी त्याचा फायदा झाला असता,परंतु प्रांताधिकारी यांच्याकडे दाखले सहा महिन्यापूर्वी पाठवूनही अद्याप ते दाखले टाकळी ढोकेश्वर मंडलाधिकारी यांच्या कार्यालयात चार महिन्यापूर्वी चौकशी साठी येऊन धूळखात पडलेले आहेत ,अद्याप त्यावर काहीच चौकशी झालेली नाही .

             दाखले वेळेवर भेटले नाहीत मनून आदिवासी बांधवांना वेगवेगळ्या अनुदानापासून तसेच शासनाच्या योजनांपासून वंचित रहावे लागले आहे .आदिवासी बांधवांना शासनाच्या विहिरी , गाय गोठा,सोलर ,अशा अनेक योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहचलेल्या नाहीत अशा सगळ्या योजनांपासून आजपर्यंत वंचित रहावे लागलेले आहे .

           तरी ते दाखले दोन तीन दिवसात जर मिळाले नाही तर तहसील कार्यालयावर रेशनिंग कार्ड आणि वृद्धापकाळ योजनेचे आंदोलन होणार आहे त्यात जर मुद्दा घेतला गेला तर शासनाला त्याच दिवशी त्या दाखल्याची दखल घ्यावी लागेल असा इशारा टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाच्या नेत्या सोनियाताई राजदेव यांनी दिला आहे .