महेंद्र वानखडे ग्रामीण प्रतिनिधी
पिंपळखुटा गावचे आराध्य दैवत संत तुळसाबाई यांचा यात्रा महोत्सव 7 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे वितरण हे या यात्रेचं स्वरूप असून पंचक्रोशीतील भाविक भक्त महाप्रसाद आणि संत तुळसाबाई यांचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत असतात. गेल्या अनेक वर्षापासून गावातील भाविक भक्त लोकवर्गणीतून धार्मिक उपक्रम राबवत असून येथील युवा पिढी संस्कारमय वातावरणात यात्रा महोत्सव साजरा करण्यासाठी पुढे येत असते. संत तुळसाबाई यांचे निसर्गाच्या सानिध्यात रमणीय असे मंदिर असून नवसाला पावणारी देवता म्हणून संत तुळसाबाई यांच्याकडे पाहिले जाते.





Social Plugin