महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी पिंपरी चिंचवड पुणे
आळंदी पुणे येथील ह भ प बाल कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज शेळके धोतरा नाईक बुलढाणा गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची विद्यार्थी यांचा कीर्तन सोहळा पार. आळंदी येथील गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची मोक्षदा एकादशी निमित्त तसेच गीता जयंतीनिमित्त ह भ प बाल कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज शेळके धोतरा नाईक यांचा कीर्तन सोहळा पार.
०१ डिसेंबर रोजी आळंदी नगरीत भक्तिमय वातावरणात मोक्षदा एकादशी निमित्त तसेच गीता जयंतीनिमित्त गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथे ह.भ.प. बाल कीर्तनकार वय वर्ष सात ज्ञानेश्वर महाराज शेळके धोतरा नाईक बुलढाणा यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कीर्तनाने उपस्थित भाविकांच्या मनाला स्पर्श केला. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मधुर वाणीने आणि ज्ञानरूपी संदेशांनी सर्वांना भक्तीमार्गाचे महत्व समजावून सांगितले. तसेच व्यसनाधीनता दारू पुडी तंबाखू गांजा या विषयावरती एवढ्या कमी वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर असं व्यसनाधीनतेवर मार्गदर्शन केलं त्यांनी आपल्या कीर्तनातून सांगितलं की अरे बाबांनो दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है तुम्हाला प्यायचे असेल तर पवित्र गाईचे दूध प्या पण दारू पिऊ नका दारुणे अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले स्वतः माझे वडील दारू पीत होते याचा मला अनुभव आला तुमच्या वडिलांनी दारू सोडली असं प्रत्येकाच्या घरामध्ये दारू पिणारे व्यक्ती असतात त्यापासून किती त्रास त्या व्यक्तीला होतो तो त्रास बाल कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज शेळके यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला सांगितला आणि समाज खूप भाविक झाला एवढ्या कमी वयामध्ये या विषयावरती खूप सुंदर असे महाराज बोलले अनेक विषयावरती महाराजांनी अतिशय कमी वयामध्ये मार्गदर्शन केले शिका आणि संघटित व्हा संघर्ष करा शिक्षणावर सुद्धा भर दिला व्यसनापासून दूर राहिले पाहिजेत विद्यार्थ्यांनी संस्कारचे धडे शिकले पाहिजेत वारकरी संप्रदायाचा प्रचार केला पाहिजे वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचन हे शिकले पाहिजेत कारण माणूस व्यसनापासून दूर राहतो आणि एक चांगला मनुष्य घडतो असा अनेक विषयावरती महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे
कीर्तनाचा विषय "भक्तीचा खरा अर्थ" असा होता, ज्यामध्ये त्यांनी संतांच्या जीवनातील आदर्श, विठ्ठलभक्तीचे सामर्थ्य आणि सदाचाराचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांच्या प्रभावी वाणीने भाविकांच्या डोळ्यांत भक्तीचे अश्रू आले आणि संपूर्ण परिसर "जय जय राम कृष्ण हरी" या गजराने दुमदुमला. श्रीमद् भगवद्गीता जयंतीनिमित्त गीतेचे महत्व सांगितले महाराजांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली ज्याला जीवन कसं जगायचं त्यांनी रोज गीतेचा एक श्लोक वाचला पाहिजेत आणि आपल्या आचरणात आणला पाहिजे तर तो मनुष्य कधीच जीवनात वाईट कृत्य करणार नाही असा खूप सुंदर संदेश ज्ञानेश्वर महाराज शेळके यांनी दिला,
या कीर्तन सोहळ्यासाठी गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची संस्थापक /अध्यक्ष ह.भ.प. संजय ढाकणे महाराज (ह.मु आळंदी देवाची महारचिखना) यांनीही उपस्थिती दर्शवली,ह.भ.प मयूर महाराज राठोड ह भ प सुभाष महाराज राठोड श्री प्राध्यापक किरण ढाकणे सर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्याच वर्षापासून बालसंस्कार शिबिर घडवते आणि ते शिबिरापासून विद्यार्थी तयार होतात असे अनेक माध्यमातून गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था कार्य करत आहे संस्थेला सहकार्य करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करू शकता.मो.९५९५०३०९०५ असे संजय ढाकणे महाराज यांनी सांगितले आहे..
.jpg)




Social Plugin