आज दिनांक एक जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाळकी खुर्द येथे शिक्षण परिषद तसेच निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमास केंद्रातील सर्व शिक्षक तसेच सत्कारमूर्ती शिक्षक उपस्थित होते...
श्री पारिक सर तसेच सोमवंशी सर यांचा निरोप समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य उपाध्यक्ष सरपंच इतर प्रतिष्ठित मंडळी, केंद्रप्रमुख, शाळेतील सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी सत्कारमूर्तींना पुष्पहार तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सदरील कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री परमेश्वर कदम, सरपंच श्री शिवाजीराव कदम, तसेच उपसरपंच श्री साहेबराव आडे. सदस्य श्री भगवान पाटील कदम, अनिल भाऊ लक्ष्तवाड.केंद्रप्रमुख श्री संदेश चोंडेकर सर,केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर. शाळेचे सर्व शिक्षकश्री कांबळे सर, शेरेकर सर, वनसागर सर, कोशटवार सर, कुंटूरकर मॅडम, राज कोंढवार मॅडम उपस्थित होते..





Social Plugin