Ticker

6/recent/ticker-posts

क्रीडा महोतवसात दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचा उत्साह कायम



प्रतिनिधी@समाधान भुतेकर इसरुळ

स्थानिक सहकार विद्या मंदिरात काल दि 1 जानेवारी पासून सुरू असलेल्या क्रीडा सप्ताहात आज दुसऱ्या दिवशीही सर्व विद्यार्थ्यांचा अप्रितीम उत्साह दिसून आला..विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी विध्यार्थ्यांना खेळ अत्यंत महवताचे आहे..

आज दुसऱ्या दिवशी खो-खो,कबड्डी वालीबॉल ,रिले ,रशी खेच ,लॉंग जप,हाय जंप अश्या सर्व खेळामध्ये खेळाडूंनी अत्यंत चित्तथरारक प्रदर्शन केले..आजच्या दुसऱ्या दिवशी सर्वात मुख्य आकर्षण स्काऊट आणि गाईड या विद्यार्थ्यांचे अत्यंत सुंदर देखावा श्री भुतेकर सर व भुतेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनात स्काऊट गाईड कवायती सादर करण्यात आल्या.सदर क्रीडा स्पर्धेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..