भारतीय कायद्याच्या साहाय्याने हुंडाबळी व बालविवाह रोखता येऊ शकते यासाठी सर्व समाजातील लोकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन परतुर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीश व्हि.बी. ढोंबे मॅडम यांनी केले. परतूर शहरातील मौलाना मोहम्मद अली जोहर उर्दू प्राथमिक शाळा येथे दिवाणी,व फौजदारी न्यायालय,व तालुका विधि सेवा समिती, तथा तालुका वकील संघातर्फे कायदेविषयक शिबिराचे आयोजन आज दिनांक ०८ जानेवारी रोजी गुरुवारी करण्यात आले होते या वेळी अध्यक्षिय समारोप करताना काव्य फुलांची उधळण करत हुंडाबळी, व बालविवाह या विषयावर, पालक शिक्षक संस्थाचालक व विद्यार्थ्यांच्या समोर त्यांनी भारतीय घटनेची माहिती देत मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परतुर येथील न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती.व्हि. बी. ढोंबे.मैडम, होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सह दिवाणी न्यायाधीश राऊत मॅडम यांची उपस्थिती होती, प्रमुख उपस्थितां मध्ये अॅड झेड. एन कादरी, अँड एल आर पाईकराव, अँड एल आर लिंबुळकर अॅड.आर बी. अंभुरे, अँड.एस बी. वैदय , अँड असीम शेख, संस्था अध्यक्ष अब्दुल कय्यूम खान पठाण, संस्थापक सचिव ए बी पठाण सर, पत्रकार एम एल कुरेशी, आदींची प्रमुख उपस्थिती होती, कार्यक्रमाची सुरुवात मोहम्मद अली जोहर उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनीच्या स्वागत गीताने झाली, प्रस्तावनापर सविस्तर मार्गदर्शन ज्येष्ठ विधिज्ञ अॅड झेड.एन कादरी यांनी केले. अँड आर एल.पाईकराव यांनी हुंडाबळी व बालविवाह प्रथा यावर सखोल मार्गदर्शन करून कायद्याची माहिती करून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक मुख्तार सर यांनी केले आभार प्रदर्शन संस्थापक सचिव ए बी पठाण सर यांनी केले, सर्वप्रथम प्रमुख उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्था अध्यक्ष व संस्थेच्या शिक्षकांच्या वतीने करण्यात आले. यावेळी शिक्षक पालक विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या शिबिरास यशस्वी करण्यासाठी मौलाना मोहम्मद अली जोहर शाळेतील शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले.





Social Plugin