Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य-धनसंपदा : जीवन समृद्ध करणारा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन पाहिजे...



 छायाचित्र - वेटणे _  स्वर विज्ञान आणि आरोग्य धनसंपदा या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा.चंद्रकांत काळी व्यासपीठावर सरपंच श्री.सुधाकर देवकर, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.के.जी.कुंभार,प्रा.डाॅ.एच.जी.निमसे,प्रा श्रीमती एम.बी.सोनार, प्रा.पी.व्ही.गायकवाड, प्रा.एस.आर.धोंगडे छाया - प्रकाश राजेघाटगे बुध 

प्रा. चंद्रकांत काळी 

बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]

 आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक शांतता, आर्थिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा यांना विशेष महत्त्व  आहे.असे प्रतिपादन श्री.चंद्रकांत काळी,माजी ‌प्राध्यापक के.बी.पी.इंजि.काॅलेज, सातारा .यांनी केले.       वेटणे येथे सूरू असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिर व्याख्यान मालिका कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करीत होते.व्यासपीठावर वेटणे ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर देवकर,कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.के.जी.कुंभार, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एच.जी.निमसे ,प्रा.श्रीमती एम.बी.सोनार,प्रा.पी.व्ही.गायकवाड,प्रा.एस.आर.धोंगडे इ.उपस्थित होते.  पुढे आपल्या भाषणात त्यांनी सांगितले स्वर विज्ञान आणि त्याचा आरोग्य व धनसंपदेवर होणारा परिणाम या विषयावर आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमात त्यांनी व सांगितले की, स्वर म्हणजे केवळ आवाज नसून तो एक ऊर्जा स्रोत आहे. प्रत्येक अक्षर, मंत्र, शब्द किंवा ध्वनी यामागे विशिष्ट कंपन असते. ही कंपन मानवी शरीरावर, मेंदूवर आणि मनावर थेट परिणाम करते. योग्य स्वरांचा नियमित उपयोग केल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते.

 सोहम,ओंकार, गायत्री मंत्र, नामस्मरण, ध्यानातील स्वर यांचे वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, या स्वरांमुळे मेंदूतील ताण कमी होतो, रक्तदाब नियंत्रणात राहतो, एकाग्रता वाढते आणि झोपेच्या समस्या दूर होतात.त्यामुळे आरोग्य सुधारण्यास स्वर विज्ञान उपयुक्त ठरते.याचबरोबर, धनसंपदा आणि मानसिक समृद्धी यांचा स्वर विज्ञानाशी असलेला संबंधही उपस्थितांना समजावून सांगण्यात आला. सकारात्मक शब्दांचा उच्चार, आत्मविश्वास वाढविणारे वाक्यप्रयोग, तसेच सकाळी आणि कामाच्या सुरुवातीला सकारात्मक घोषवाक्ये म्हणण्याची सवय केल्यास विचारसरणी बदलते.विचार सकारात्मक झाले की, कृतीत बदल होतो आणि त्यातून यश व आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात स्वर विज्ञानाचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन देण्यात आले. योग्य श्वसन, ध्यानधारणा, मंत्रोच्चार आणि सकारात्मक संवाद यांचा सराव केल्यास व्यक्तिमत्त्व विकास साधतो, असेही सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात  सरपंच श्री.सुधाकर देवकर, यांनी  सांगितले की, आरोग्य, मानसिक शांतता आणि धनसंपदा या तिन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. स्वर विज्ञान हे त्यांना जोडणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे नव्या पिढीने अंधश्रद्धा न ठेवता विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.कर्णे  मोहिनी यांनी केले.पाहुण्यांचा परिचय कु.अंकिता साळुंखे यांनी केले. सुत्रसंचलन कु. कर्णे मोहिनी हिने केले.आभार ऐश्वर्या शिर्के हिने मानले. 

कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी,  विद्यार्थ्यांनी  व नागरिक उपस्थित होते.