Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ज्योतिरावफुले जनआरोग्य योजना आढावा बैठक.



अनिकेत चांदणे ग्रामीण प्रतिनिधी

विस्तारित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने संदर्भात आज सविस्तर आढावा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली.

या प्रसंगी पार पडलेल्या बैठकीत शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना ०५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, या योजनेचा लाभ प्रत्येक गरजू रुग्णाला योग्यरीत्या मिळावा,या अनुषंगाने संबंधितांना निर्देश देण्यात आले.

तसेच अंगीकृत रुग्णालयांबाबत येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत नियमित तपासणीसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे देखील निर्देश यावेळी देण्यात आले. 

यावेळी कोणत्याही परिस्थितीत रुग्णांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देऊन गोल्डन कार्ड वितरण, रुग्णसेवा तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी बाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

आरोग्यसेवा अधिक पारदर्शक, गुणवत्तापूर्ण व सर्वसामान्यांच्या हिताची राहील या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना राबण्यासंदर्भात सूचना संबंधितांना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी पार पडलेल्या बैठकीस खा. श्री.अनुप धोत्रे,आ.श्री.रणधीर सावरकर,श्री.प्रकाश भारसाकळे, श्री.नितीन देशमुख,श्री.हरिश पिंपळे, साजिदखान पठाण,श्री.किरण सरनाईक,श्री.अमोल मिटकरी, श्री.वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना,पोलीस अधिक्षक श्री.अर्चित चांडक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, मनपा आयुक्त सुनील लहाने आदी उपस्थित होते.