Ticker

6/recent/ticker-posts

जालना शहरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस।

 








 जालना प्रतिनिधी संजीव पाटील।

 जालना शहरांचा पिण्याचा पाण्याचा.प्रश्न कायमस्वरूपी मिटविणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री 

देवेंद्र फडणवीस यांनी जालना शहरवासीयांना दिले. फडणवीस महानगरपालिका निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. जालना ला पहीला महापौर भाजपा चा होणार आहे.जालना शहरांचा विकासासाठी भाजपाला मतदान करा असे आवाहन जालना शहरातील नागरिकांना केले.

पाणी प्रश्नना बरोबर च जालना शहरातील कचरा चां प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना शहरवासीयांना दिले. घनकचरा व्यवस्थापन करणार असल्याचे आश्वासन दिले सौर उर्जा प्रकल्पासाठी शंभर कोटी रुपये दिल्याचे सांगितले, जालना शहरासाठी समृध्दी महामार्ग ड्राय पोर्ट , रेल्वे स्थानका साठी निधी, अंतर्गत रस्त्यासाठी निधी दिला असुन जालना शहरांची ओळख स्टील नगरी पोलाद नगरी अशी आहे येथे नवीन गुंतवणूक येत असुन भविष्यात रोजगार निर्मिती होणार आहे.त्यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.मालकी हक्काचे पट्टे देऊन बेघर कच्चे घरांना पक्के घरकुल देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना सभेत दिले. विरोधकांनी लाडकी बहिण बंद होणार असे म्हटले आहे परंतु लाडकी बहिण योजना बंद होणार नसुन सुरुची राहणार असल्याचे आश्वासन जालना सभेत लाडक्या बहिणींना दिले. लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सभेसाठी मंचावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, भास्कर आबा दानवे, सिध्दीविनायक मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती