मन्सूर शहा. धोत्रा.भंनगोजी :-----
-आज जनसेवेच्या नव्या पर्वाची भव्य सुरुवात! चिखली नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यास, सपन्न.
आज चिखली नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री. पंडितदादा देशमुख यांच्या पदग्रहण सोहळ्यास लोकशाही मूल्यांना अधोरेखित करणारा हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
लोकनियुक्त नगराध्यक्षांनी पदग्रहण करताना सर्वसमावेशक विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली चिखली नगरपरिषद निश्चितच विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. प्रशांत बिडकर, शहराध्यक्ष श्री. सागर पुरोहित, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, श्री. सतीशजी गुप्त, श्री. सुरेशअप्पा खबुतरे, श्री. राजाभाऊ खरात, श्री. अंकुशराव पाटील, श्री. भाई विजय गवई, डॉ. श्री. आशुतोष गुप्त, श्री. रामदासभाऊ देव्हडे, डॉ. श्री. कृष्णकुमार सपकाळ, श्री. सुरेंद्रजी पांडे, श्री. विलास घोलप, श्री. मंगेश व्यवहारे, श्री. जसवंत श्रीवास्तव, श्री. शिवाजीराव देशमुख, श्री. कपिल खेडेकर, श्री. अमोल साठे, श्री. विजय वाळेकर, श्री. सिद्धेश्वर ठेंग, गटनेते श्री. अमोल खबुतरे आदी मान्यवर तसेच नवनियुक्त नगरसेवक-नगरसेविका आणि चिखलीतील जागरूक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin