वार्ताहर लक्की राठोड मांडवी नांदेड
किनवट तालुक्यातील मांडवी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात 'यात्रा ग्राम स्नेहसंमेलन' आयोजित करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा सोहळा पार पडणार असून, या निमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या १० दिवसांच्या महोत्सवात पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे गावातील एकजूट आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन.मांडवी ग्रामस्थांच्या वतीने या स्नेहसंमेलनासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, परिसरातील सर्व भाविकांनी आणि नागरिकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





Social Plugin