Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर आज यशस्वीरीत्या पार





भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी 


उमरेड MIDC येथे अपेक्स मजदूर संघ, उमरेड व राज्य कामगार विमा सोसायटी, कामगार रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अपेक्स बिल्डसीस लिमिटेड या कंपनीतील कामगारांसाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर आज यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिराचे उद्घाटन अपेक्स मजदूर संघाचे उपाध्यक्ष श्री. रोहीत सुधीर पारवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कामगार रुग्णालयाचे डॉ. श्री कांबळे व त्यांची वैद्यकीय टीम, अपेक्स मजदूर संघाचे पदाधिकारी श्री.प्रभाकर बुचे, श्री.बबन देशमुख, श्री.राहुल भिल, श्री.अशोक चौधरी, श्री.संदीप चौधरी, श्री.युवराज खंडाळ, श्री.दीपक बिसेन आणि अपेक्स बिल्डसीस लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.

या आरोग्य शिबिराचा शेकडो कामगारांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी, आरोग्य सल्ला, कामगारांना सरकारकडून मिळत असलेल्या विविध सुविधा व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संघाचे उपाध्यक्ष श्री. रोहीत पारवे यांनी जाहीर केले की, कामगारांचे आरोग्य व कल्याण लक्षात घेता अपेक्स मजदूर संघाच्या वतीने उमरेड एमआयडीसी परिसरात अशा प्रकारची आरोग्य शिबिरे सातत्याने राबविण्यात येतील.

कामगारांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांना वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने अपेक्स मजदूर संघ कामगारांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर आहे असेही रोहित पारवे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.