देगलूर- प्रतिनिधी
नगर परिषद येथे स्थायी आणि विषय समित्या गठीत
२१.०१.२०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. १६ नगर सेवक हजर नसल्याने हि सभा व्यपगत झाल्याचे घोषित करण्यात आले. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ६३, ६४ आणि ६६ नुसार, नगर परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता आणि लोकशाही प्रक्रिया टिकवून ठेवण्यासाठी 'स्थायी समिती' आणि 'विषय समित्या' (शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा इ.) गठित करणे बंधनकारक आहे.
परंतु, अत्यंत खेदाची बाब अशी की, बिलोली नगर परिषदेत अद्याप या समित्यांचे गठन करण्यात आलेले नाही. दि 21जानेवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते नगर सेवक अनुपस्थित होते तर फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीचे असे चार नगर सेवक
उपस्थित होते. हि सभा व्यपगत झाल्याचे घोषित करण्यात आले.समित्यांच्या अभावामुळे खालील समस्या निर्माण होत आहेत: १. शहराच्या विकासकामांचे धोरणात्मक निर्णय घेण्यास विलंब होत आहे. २. आर्थिक तरतुदी आणि निधीच्या खर्चावर लोकशाही पद्धतीने नियंत्रण राहिलेले नाही. ३. विषय समित्या नसल्याने आरोग्य आणि पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या तक्रारींचे निवारण प्रभावीपणे होत नाही.
नगर परिषदेचे कामकाज केवळ प्रशासकीय स्तरावर चालवणे हे अधिनियमाच्या मूळ उद्देशाला बाधा आणणारे आहे. लोकप्रतिनिधींच्या समित्या नसल्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटत नाहीये.या प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ विशेष सभा बोलावून नियमानुसार स्थायी व विषय समित्यांची निवड करण्याचे आदेश संबंधित प्रशासनास द्यावेत. अन्यथा, लोकशाही मार्गाने या अन्यायाविरुद्ध जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा समाज सेवक सय्यद रियाज यांनी मुख्याधिकारी बिलोली यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन दिले आहे.





Social Plugin