पाटण (दिनकर वाईकर)
पाटण तालुक्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रीय समाज पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) यांच्या ३ पक्षीय युतीतील उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान कार्यकर्ते व समर्थकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या युतीअंतर्गत राष्ट्रीय समाज पक्षाचे तीन उमेदवार तर बळीराजा शेतकरी संघटनेचा एक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे चंद्रकांत यादव यावेळी बोलताना म्हणाले युतीने ग्रामीण विकास, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, महिला सशक्तीकरण आणि सामाजिक न्याय हे प्रमुख मुद्दे केंद्रस्थानी ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्धार आम्ही व्यक्त केला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारीणी सदस्य विठ्ठल यमकर यांनी तरुणांसाठी रोजरगार निर्मिती व तालुक्यातील जनतेवर होतं असलेल्या विविध अन्यायकारक निरंर्णयांविरोधात आम्ही लढत आहोत. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) तालुका अध्यक्ष विकास कांबळे म्हणाले तालुक्यातील जनतेने आम्हाला पाठींबा द्यावा ही लढाई आपल्या न्याय हक्कासाठी आहे हुकूमशाहीच्या विरोधातली आहे.





Social Plugin