साहेबराव अंभोरे @ ग्रामिण प्रतिनिधी
3 जानेवारी 26 मेहकर
रिसोड तालुक्यातील मांगुळ झनक येथे शौर्यदिनी शूरवीरांना गीतांच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली.प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम दिनांक 2 जानेवारी रोजी उत्साहात पार पडला.
स्वरसम्राट जनजागृती कलामंच आंध्रुड ता. मेहकर जि. बुलढाणा यांनी सुरेल प्रबोधनात्मक, मनोरंजक,महापुरुषांची गीते सादर करून कार्यक्रमात उत्साह वाढविला.
शाहीर भिमराव अंभोरे,साहेबराव अंभोरे,दत्ता पवार,संदीप बोदडे या गायकांनी सुमधुर स्फूर्तीदायी गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी गायकांनी निळ्या पाखरांची वंदना भीमराया, मानवा जा बुद्धाला शरण, नववर्षाची सुरुवात करतो 500 महारांना सलामी देऊन, डॉक्टर झाली कलेक्टर झाली, बाई माव्हा पोरगा साहेब झाला व आहे बाबासाहेबांचं देणं, कुणी नाही केलं भलं व माय भीमानं केलं, बाबासाहेबांनी दिलं रं बाबासाहेबांनी, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे,काळजवरी कोरले नाव भीमा कोरेगाव अशी एक से बढकर एक गीते सादर केली. शेवटी भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव या स्फूर्तीदायी गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध बँजो वादक संदीप बोदडे व ढोलक वादक सिद्धेश्वर बोराडे यांनी तोलामोलाची साथसंगत दिली. कोरस सत्यभामा बाई कांबळे व शंकुतला अंभोरे यांनी केला.
वत्सगुल बुद्ध विहार व्यवस्थापन समिती, मांगुळ झनक चे पदाधिकारी पुंडलिक दौलत लेमाडे, रामकिसन सत्यभान डुकरे ,नंदकिशोर आत्माराम लेमाडे,गजानन दत्तात्रय लेमडे, गणेश गोपाल डुकरे, प्रविण प्रकाश झरे,दत्ता वामन वारे,विलास प्रल्हाद साबळे,प्रदिप निवृत्ती लेमाडे,कृष्णा भास्कर वारे, गौतम पुंजाजी लेमाडे तसेच क्रांतीसुर्य नवयुवक मंडळ यांनी कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आयोजन व नियोजन केले होते.
कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य महिला पुरुष विद्यार्थी हजर होते यावेळी गायकांनी बाबासाहेबांच्या १८ तास अभ्यासाचे महत्त्व विषद केले. शेवटी बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
चौकट - शाहीर भिमराव अंभोरे,साहेबराव अंभोरे व दत्ता पवार हे गेल्या ३० वर्षांपासून स्वरसम्राट जनजागृती कलामंच,आंध्रुड माध्यमातून भिमगीतांच्या द्वारे समाजाच्या तळागाळात जाऊन समाजाचे प्रबोधन करत आहेत.महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात या कला समूहाचे कार्यक्रम लोक मोठ्या आवडीने घेतात. साधी सोपी समजेल अशी भाषा, शेरोशायरी, सुमधुर आवाज हे या संगीत समूहाचे खास वैशिष्टे आहे.






Social Plugin