Ticker

6/recent/ticker-posts

S C -ST आरक्षण न सुटल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन, न्यायालयात जाण्याचा इशारा.



दिनेश पत्की कळमनुरी हिंगोली 

पोलिस पाटील आरक्षण सोडत बाबत 12 गावामधून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तक्रारी आक्षेप दाखल,

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण न सुटल्याने उपविभागीय अधिकारी,कळमनूरी यांना मागण्यांचे दिले निवेदन...!

कळमनुरी तालुक्यातील 89 गावांमधील 5 जानेवारी 2026 रोजी पोलीस पाटील या रिक्त पदांसाठी आरक्षण सोडत झाली होती. सदरील सोडण्यात आलेली आरक्षण सोडत या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती बाबत काही गावांमध्ये योग्यरीत्या सोडण्यात आलेली नाही याबाबत वंचित बहुजन आघाडी तालुका संपर्क कार्यालय तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांच्याकडे गावकऱ्यांच्या वतीने तक्रार दाखल झाली होती. त्या अनुषंगाने जवळपास 12 गावातील जसे की सावंगी भुतनर, साळवा, चिखली, आडा, पारडी , वसफळ ,डोंगरगाव पूल, शेनोडी, येळेगाव तुकाराम, चिंचोर्डी, रुपूर व इतर सर्व गावातील तक्रारी अर्ज घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कळमनुरी यांना अनेक मागण्यांची तक्रारी निवेदन देण्यात आले. यामध्ये सदरील गावांमध्ये कोणत्या शासकीय नियमावलीनुसार आरक्षण सोडत झालेली आहे, कशा पद्धतीने सोडत झाली आहे, काही ठिकाणी सदरील काही प्रवर्गाची लोकसंख्या नसून देखील तिथे आरक्षण सोडण्यात आले, याची देखील चौकशी करण्यात यावी.तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवर गेली कित्येक वर्षापासून ज्या गावांमध्ये आरक्षण सोडल्या गेले नाही,त्यानुसार सदरील गावांमधील आत्ता सुटलेले आरक्षण रद्द करून SC व ST प्रवर्गासाठी आरक्षण सोडत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.सदरील तक्रारी आक्षेप अर्जावरती शासनाने गंभीर भूमिका जर घेतली नाही तर उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा देखील आज रोजी देण्यात आला. 

यावेळी कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे, युवा तालुकाध्यक्ष मोहम्मद असलम,युवा ता.महासचिव संतोष इंगोले,जेष्ठ नेते प्रियानंद घोडगे, शहर अध्यक्ष शकील पठाण,बापुराव महाजन,जेष्ठ काशिनाथ साळवे, स.वि.आ.ता.अध्यक्ष प्रशांत चोपडे, दाती शाखा अध्यक्ष करण नरवाडे, आडा शाखा अध्यक्ष विनोद ढेपे,कार्यकर्ते मुकिंदा ढेपे,भगवान ढेपे,राहुल खिल्लारे,दिनेश पाईकराव,समाधान पाईकराव, प्रशांत साळवे, प्रबुद्ध पाईकराव,गणेश पोटे, व इतर समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.