Ticker

6/recent/ticker-posts

शिवसैनिकांचा गनिमी कावा.... कॅनलला पाणी सोडावे,

 


बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

शिवसैनिकांचा गनिमी कावा.... कॅनलला पाणी सोडावे, या प्रश्नासाठी शिवसैनिक आक्रमक, नेर तलाव येथे पाणी सोडण्याच्या यंत्रणेवर शिवसैनिकांच ठीया, पाणी सोडत नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नाही, अशी  जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांची भूमिका घेतली . कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष , आमदार महेश शिंदे यांच्या आश्वासनानंतर व पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित  करण्यात आले . येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खटाव तालुक्यासाठी राखीव असलेले पाणी  खालच्या भागात पाणी जात आहे . ज्यांना पाण्याची गरज आहे, पिके सुखायला लागले आहेत ही बाब राजकारणी व प्रशासन यांच्या लक्षात येत नाही का  ? असा सवाल प्रताप जाधव यांनी केला . नेर तलाव भरभरून वाहत असताना सुद्धा नेर कालव्यास पाणी सोडलेले नाही .पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत .
अडीच हजार शेत्र या कालव्याच्या पाण्याखाली सिंचनास येतं . पुसेगाव, खटाव ,खातगुण, दरुज, दरजाई ,जाखणगाव, सिद्धेश्वर कुरवली ,भाडेवाडी, हुसेनपुर ,नागाचे कुमटे या गावांना या पाण्याचा लाभ मिळतो ,परंतु संबंधित विभाग याकडे कायम उदासीन असतो . मतदारसंघात दोन लोकनियुक्त आमदार आहेत पण याकडे जातील लक्ष घालत नाही असे दिसत आहे .जर वर्षी पिके सुखायला लागली तरी पाणी सोडण्याचे नियोजन होत नाही, यावरून प्रतिनिधींची निष्क्रियता दिसते .सारा भाग ओलिताखाली आला तरी नियोजना अभावी पिकाचे लाखो रुपये नुकसान होत आहे याविषयी शेतकरी उदासीन व आक्रमक असून येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा विभागाने पाणी सोडावे .यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय नांगरे, उप तालुकाप्रमुख आमिन आगा ,उप तालुकाप्रमुख  मुगुटराव कदम, शेतकरी सेनेचे अस्लम भाई शिकलगार, संजय नलवडे, कन्हैया आगाशे, भगवान भराडे ,अशोक घोरपडे ,नंदू शिर्के ,भरत घोरपडे, लाला मदने ,अशोक घोरपडे ,राजू शिर्के , मोठया संख्येने शिवसैनिक शेतकरी उपस्थित होते .