Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईल मधील त्रोटक माहितीच्या आधारे किशोरवयीन मुलींचे आरोग्य घोक्यात येण्याची शक्यता : डॉ सौ वर्षा गायकवाड .

 


अतिरिक्त टाळून महिला गुरुजन,डॉक्टरांशी मनमोकळ्या गप्पा मारण्याचा दिला सल्ला 

बुध   दि . [ प्रकाश राजेघाटगे]

 सध्या किशोरवयीन मुली मोबाईलचा अतिवापर करत आहेत.या वयात मोबाईलचा अतिरेक टाळून आहार विहार, स्वच्छता राखून स्वतःचा शारीरिक, मानसिक व भावनिक विकास साधावा.मोबाईलमधील त्रोटक माहितीच्या आधारे किशोरवयीन मुलींचे आरोग्य घोक्यात येण्याची शक्यता असल्याचे प्रतिपादन डॉ सौ वर्षा गायकवाड यांनी केले.

              खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्ताने साजरा होत असलेल्या लेक शिकवा, लेक वाचवा  अभियानांतर्गत आयोजित केलेले कार्यक्रमात "किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयक समस्या आणि ताणतणाव व्यवस्थापन "या विषयावर त्या बोलत 

होत्या. यावेळी प्राचार्य प्रोफेसर डॉ जे पी कदम, डॉ विवेक गायकवाड, पर्यवेक्षक प्रा के बी जाधव, प्रा सौ व्ही एम इनामदार यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते.

              मुली वयात येताना होणाऱ्या बदलामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास निश्चित करणे गरजेचे असल्याचे सांगून डॉ वर्षा गायकवाड म्हणाल्या मुलींनी याकाळात स्वतः च्या आहार, विहार, स्वच्छता याबाबत अत्यंत जागृत राहणे गरजेचे आहे.कुणाशीही अवांतर गप्पा मारणे , अनोळखी व्यक्तीच्या सोबत जवळीक न साधणे टाळावे. मोबाईलचा अतिरेक करू नये,आपल्या पालकांशी, डॉक्टरांशी,कॉलेज मधील महिला गुरुजनाशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले

डॉ बी बी राठोड यांनी प्रास्ताविक तर प्रा के बी जाधव यांनी परिचय करून दिला. सुत्रसंचलन प्रा जठार तर प्रा कु एस डी पाटोळे यांनी आभार मानले.