कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
मंठा -आज दिनांक 15/01/2026 वार गुरुवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माळकीनी येथे सकाळी 10 वाजता बालआनंद मेळाव्याचे उदघाटन सरपंच जगदीश जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी काशिनाथ राठोड, नुतन केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी देशमुख,रानमळा शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ गोंडगे, टोकवाडी तांडा शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ वायसे, विरगव्हाण शाळेचे मुख्याध्यापक दिपक अंभोरे, विरगव्हाण तांडा शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत जोशी यांच्या उपस्थित झाले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पालक, गावातील प्रतिष्टीत नागरिक आणि गावातील सर्व नागरिकांचे शाळेतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविक भाषणात शाळेचे मुख्याध्यापक भगवान जायभाये यांनी आनंद नगरीच्या आयोजनाचे महत्व विषद केले.प्रमुख मान्यवरांचे मनोगतानंतर उपस्थित मान्यवर गावातील पालक आणि नागरिक यांनी विद्यार्थ्यांनी तयार करुन आणलेल्या विविध पदार्थांचे आस्वाद घेतले .
या आठवडी बाजार आणि खाऊ गल्ली कार्यक्रमासाठी माळकिणी गावाबरोबरच विरगव्हाण आणि विरगव्हाण तांडा शाळेतील विद्यार्थ्यांनीं देखील सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास सुदेवाड तर आभार प्रदर्शन संदिप धामणे सर यांनी केले.





Social Plugin