Ticker

6/recent/ticker-posts

टाकळी ढोकेश्वर स्वतंत्र पोलिस स्टेशन व्हावे यासाठी पी आय खेडकर यांना निवेदन.



 पारनेर प्रतिनिधी.

   पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर पोलिस स्टेशन 2019 साली मंजूर झाले असून अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही ,मंजुरी फक्त कागदावरच आहे .टाकळी ढोकेश्वर पोलिस चौकी अंतर्गत 45 ते 50 गावांचा समावेश असून ,मोठा परिसर आहे .

   सध्या वाढती गुन्हेगारी आणि धोके लक्षात घेता स्वतंत्र पोलिस स्टेशन ची गरज आहे आणि ते लवकरात लवकर सुरू करावे असे पत्र टाकळी ढोकेश्वर जिल्हा परीषद गटाचे नेते रविंद्र राजदेव यांनी दिले.

       तसेच टाकळी पोलिस स्टेशन अंतर्गत एवढ्या गावांचा समावेश असून त्याठिकाणी वाहन सुद्धा नाही ,ते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे ,रात्री अपरात्री काही घटना घडल्यास गाडी उपलब्ध होत नाही त्यामुळं अधिक धोका वाढतो,लवकरात लवकर गाडी उपलब्ध करावी ही मागणी रविंद्र राजदेव यांनी केली आहे.