Ticker

6/recent/ticker-posts

स्नेहसंमेलन शासकीय वसतिगृहात उत्साहात साजरा



सतीश पांडे – कळमेश्वर प्रतिनिधी 

कळमेश्वर : कळमेश्वर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांच्या नेतृत्वाखाली कळमेश्वर, सावनेर, काटोल वसतिगृहांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक मनोज काळपांडे, योगेश तितरमारे, राम नेहारे, अधीक्षिका प्रतीक्षा मोहने, रीना गोंडाने, वरोडा सरपंच संगीता वासनिक उपस्थित होते. पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी शासकीय योजना आणि सोईसुविधांचा लाभ घेत, अभ्यासात प्रगती करावी आणि जीवनात यश प्राप्त करावे, असे सांगितले. कार्यक्रमात नृत्य, गायन, नाट्य यांसारख्या कलांचे सादरीकरण करण्यात आले होते, तसेच मैदानी खेळाचे आयोजनही करण्यात आले होते. आयोजनासाठी मोनिका बुरडे, प्रीती गायकवाड, पूजा रेंगे, निलोफर खान, मीनाक्षी ढोक, शशिकला बांबल, तुलसी बकाल, वैशाली डाखोळे, ज्योत्स्ना मरडवार, मनीषा ठाकरे, संगीता भिमटे, नीता भाकरे, नम्रता डोंगरे, राखी पांडे यांनी सहकार्य केले.