गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी
बिरोबावाडी: दौंड तालुक्यातील बिरोबावाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. १८ आणि १९ जानेवारीच्या मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, येथील रहिवासी योगेश कोळेकर यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर स्पष्टपणे कैद झाला आहे.
मध्यरात्रीच्या शांततेत शिकारीच्या शोधात असलेला हा बिबट्या कोळेकर यांच्या घराच्या परिसरात फिरताना दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्या असल्याची चर्चा होती, मात्र आता ठोस पुराव्यासह त्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिक धास्तावले आहेत. रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.





Social Plugin