Ticker

6/recent/ticker-posts

बहिनीचा निधी जमा पण नमो किसान सन्मान निधीची प्रतिक्षा कायम.



 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

दिग्रस : राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात निधी जमा होण्यास सुरवात झाली आहे. लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या नमो किसान सन्मान निधीच्या हप्त्या बाबत अद्यापही अनिश्चीता कायम असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमडत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता वेळेत मिळाल्यामुळे अनेक महीलाना दिलासा मिळाला आहे. घरखर्च, आरोग्य व शिक्षणासाठी या निधीचा उपयोग होणार असल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांना दिली.शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत असले तरी शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र वेगळीच परिस्थीती दिसून येत आहे. शेतीसाठी लागणारे बी बीयाणे खते औषधे यांच्या वाढत्या खर्चामुळे आधीच आर्थीक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधीचा मोठा आधार असतो. मात्र हप्ता कधी जमा होणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहीती नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. वारवार चौकशी करूनही ठोस उत्तर मिळत नसल्याची तक्रार केली आहे महीलाना मदत देणे स्वागतार्ह आहे. पण शेतकऱ्यांनाही तितकाच न्याय मिळायला हवा अशी भावना शेतकरी संघटना कडून व्यक्त होत आहे. शासनाने लवकर नमो किसान सन्मान निधीचा हप्ता खात्यात जमा करावा अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान येत्या काही दिवसात याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. नमो किसान योजनेचा निधी गेल्या सात महिन्यांपासून शासनाने दिले नसले तरी हरकत नाही मात्र आमच्या शेतातील पिकाला शासनाने भाव दिला पाहिजे व शेती उपयोगी बीयाणे व औषधे यांचा भाव कमी करण्यात यावा जेणे करून शेतकरी सुखावेल व शेतकरी आनदात राहील त्यामुळे नमो किसान योजनेचे शासकीय तुटपूजी मदत नाही दिली तरी चालेल, अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी होत आहे.