Ticker

6/recent/ticker-posts

उमरगा पंचायत समितीमध्ये एकदिवसीय 'राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान संपन्न



उमरगा तालुका प्रतिनिधी विश्वनाथ स्वामी 

उमरगा तालुक्यातील ग्राम पंचायत सरपंच, ग्राम विकास अधिकारी/ग्राम पंचायत अधिकारी, यांची उमरगा पंचायत समिती बैठक हॉल मध्ये एकदिवसीय राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कार्यक्रम संपन्न झाला 

 उमरगा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री प्रशांत मरोडकर साहेब यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली 

एकदिवसीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात,पंचायत सक्षमीकरण, व डिजिटल इंडियाचा प्रसार,कसा करावा आणि शाश्वत विकासावर जास्तीत जास्त कसे भर देण्यात यावे ज्यात ग्रामपंचायतींना सक्षम बनवणे व तसेच, ग्रामपंचायत कार्यालय चे आर्थिक स्वावलंबन वाढवणे,व आपले गाव स्वच्छ व हरित गावे निर्माण करणे, आणि शासकीय व इतर निधी अंतर्गत सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे यावर सर्वच ग्रामपंचायतीने लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत होऊन 'ग्राम स्वराज्य' साधता येईल . 

या अभियानाचे मुख्य मुद्दे व उद्देश पंचायतीराज संस्था बळकट करणे, व ग्राम पंचायत मध्ये पारदर्शकता प्रशासन देणे, आर्थिक स्वावलंबन साधणे आणि शाश्वत विकास घडवणे.आशा विविध विषयावर तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले 

घटक: यात सुशासन, आर्थिक सक्षमीकरण (CSR), जल व पर्यावरण व्यवस्थापन, योजनांचे अभिसरण (Convergence), आणि रोजगार निर्मिती यांचा समावेश आहे

 एक दिवसीय राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान प्रशिक्षक म्हणून यशदा पुणे ट्रेनिंग सेंटर येथून आलेले ट्रेनर मास्टर सत्यवती इंगळे ,व शिवरत्न वाले, 

 ह्या अभियानासाठी पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री संजय राऊत साहेब, श्री गणेश राठोड साहेब, के बी भांगे साहेब, श्रीनिवास पाटील साहेब व तालुक्यातील सरपंच ग्रामविकास अधिकारी/ ग्रामपंचायत अधिकारी या सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते व हे कार्यक्रम व्यवस्थित रित्या संपन्न झाली