Ticker

6/recent/ticker-posts

अंगणवाडी मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

 


राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी साजरी केली जाते. सावित्रीबाई फुले यांनी महिलांचे शिक्षण, समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले.

 त्या काळातील रूढी, अंधश्रद्धा आणि विरोध असूनही त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या, विधवा-पुनर्विवाहाला पाठिंबा दिला आणि अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवला. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल हे धाडसाचे आणि समाजहिताचे होते. त्यामुळेच त्यांची जयंती साजरी करताना केवळ शुभेच्छा देणे पुरेसे नाही; त्यांच्या विचारांचा स्वीकार करून कृतीत उतरवणे हीच खरी आदरांजली ठरते. या निमित्ताने लहान मुले मुली सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या वेशभूषा करून अंगणवाडी मध्ये आले. होते त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हार व पुष्प अर्पण करण्यात आले. व सावित्रीबाई यांच्या विषयी माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी अंगणवाडी सेविका सौ. तारा साखरे, सौ. अल्का कोल्हटकर , मदतनीस नंदिता मनवर, मेघा बनसोड. यांनी प्रयत्न केले. अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुला मुलींचे आई वडील उपस्थित होते.