बारामती 28 जानेवारी 2026 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि जनसामान्यांचे नेते अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समजताच गावातील जिल्हा परिषद शाळा कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय व हायटेक इंग्लिश स्कूल या शाळेत दादांना आदरांजली वाहण्यात आली व शाळेला सुट्टी दिले. येणेगुर गावासह राज्याच्या विविध भागांत शोककळा पसरली आहे. या शोकाकुल घटनेनंतर काल दि,28/01/2026 रोजी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व समस्त ग्रामस्थ व्यापारी आणि नागरिकांनी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मरि आई चौक येथे 2 मिनिटे निशब्द राहुन दादा ना आदरांजली वाहण्यात आली दि,29/01/2026 रोजी गावातील व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपली दुकाने व आस्थापना सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत बंद ठेवून आपल्या लाडक्या दादा/नेत्याला श्रद्धांजली वाहिली
येणेगुर गावात शुकशुकाट अपघाताची वार्ता पसरताच सर्वांच्या मनात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दादा कामांचा पक्का वादा येणेगुर गावातील करोणा काळात वॅक्सिंन इंजेक्शन चा तुटवडा निर्माण झाला होता पण दादा चे कार्यकर्ते येणेगुर गावचे तंटामुक्त उपाध्यक्ष सिद्धेश्वर उर्फ अप्पू हिप्परगे यांनी दादांना फोन लावल्यास इंजेक्शन त्वरित उपलब्ध झाले व गावातील कवठे मामा यांचे मुंबई येथील बिल्डरने फ्लॅट बाबत रक्कम घेतली होती व ती फ्लॅट ही दिलं नव्हतं आणि रक्कम ही देत नव्हते पण हिप्परगे नी कवठे मामा यांना घेऊन थेट दादांचे कार्यालय गाठले व दादांना सर्व हकीकत सांगितले व दादाचा काम पक्का वादा दादा त्वरित
आई जी ना फोन करून त्यांच्या रकमेचा मार्ग खुला केला असे दादा पुन्हा न होणे असे सिद्धेश्वर उर्फ आप्पु हिप्परगे यांनी सांगितले व्यापाऱ्यांचा निर्णय अजित पवार यांच्या निधनामुळे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय पुर्णपणे बंद ठेवला. बाजारपेठेत शुकशुकाट असून, नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार थांबवले आहेत. अश्रूंचा बांध येणेगुर आणि आसपासच्या परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा होऊन 'दादा, दादा' असा हंबरडा फोडला
राज्यभरात दुखवटा मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांचा राज्य-दुखवटा घोषित केला असून, शासकीय कार्यालये बंद ठेवली जाणार आहेत.अजित पवार यांच्या निधनाने एका लोकप्रिय व कर्तव्यदक्ष नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे. या घटनेनंतर गाव आणि व्यापारी वर्गाने एकमुखी बंद पुकारून त्यांना श्रद्धांजली वाहिली.





Social Plugin