शिवसेना (शिंदे गट) जिल्हा परिषद सदस्य पदासाठी सौ. दिपाली अमोल भिंगारे यांचे नाव आघाडीवर.
डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
काजळेश्वर सर्कलमध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेना (शिंदे गट) कडून सदस्य पदासाठी सौ. दिपाली अमोल भिंगारे यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. या चर्चेमागे एक सशक्त सामाजिक आणि विकासाभिमुख पार्श्वभूमी आहे.
सौ. दिपाली भिंगारे यांचे पती अमोल पाटील भिंगारे हे शिवसेना (शिंदे गट) ओबीसी सेलचे तालुका प्रमुख तसेच जान्होरी गावचे सरपंच आहेत. जाती–धर्म–पंथाचा भेद न करता सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करणारा नेता म्हणून अमोल पाटील भिंगारे यांनी जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या सामाजिक स्वीकारार्हतेचा सकारात्मक प्रभाव सौ. दिपाली भिंगारे यांच्या उमेदवारीवर स्पष्टपणे दिसून येतो.
ग्रामपंचायत आणि पक्षीय पातळीवर अमोल पाटील भिंगारे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. गोरगरीब, अनुसूचित जाती–जमाती, वंचित घटकांसाठी त्यांनी सातत्याने हातभार लावला. तालुक्यात मजबूत असलेला हा ओबीसी नेतृत्वाचा
.jpg)




Social Plugin