Ticker

6/recent/ticker-posts

आधुनिक तंत्रज्ञान शेतीसाठी उपयुक्त: डॉ. राजेश डवरे.



वाशिम प्रतिनिधी ओंकार पुरी :

रिसोड: उत्तमचंद बगडिया महाविद्यालयाच्या वतीने मांगवाडी येथे आयोजित 'विशेष संस्कार शिबिरात' कृषी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कीटकशास्त्रज्ञ डॉ. राजेश डवरे उपस्थित होते.

डॉ. डवरे यांनी स्पष्ट केले की, कृषी क्षेत्रातील समस्यांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे, मात्र निर्णय प्रक्रियेत मानवी कल्पकता महत्त्वाची ठरते. माजी कृषी अधिकारी संजय उखळकर यांनीही शेतीविषयक समस्यांवर उपाय सुचवले. प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रा. मंगल खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. या शिबिरात गावातील शेतकरी व रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.